⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Big Breaking : भाजपात फेरबदल, बावनकुळे प्रदेशाध्यक्ष तर शेलार मुंबई प्रदेशाध्यक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । राज्याच्या भाजपमध्ये अनेक दिवसापासून चर्चेत असलेले संघटनात्मक बदल अखेर आज झाले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश झाला असून कॅबिनेट मंत्री म्हणून नुकतेच त्यांनी शपथ घेतली आहे. राज्यात आगामी काळात सरकार स्थिर ठेवणे, मुंबई मनपा काबीज करणे, लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करणे अशा सर्व गोष्टी लक्षात घेत भाजपने मोठे बदल केले आहेत.

गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून वर्णी लागली असून दमदार नेतृत्व आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय आशिष शेलार यांच्यावर मुंबई प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या नियुक्तीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. राज्यातील सत्ता नाट्य आणि मंत्रिमंडळ विस्तारा नंतर भाजपने राज्यात मोठे फेरबदल केले आहेत. मुंबई भाजपाची जवाबदारी आशिष शेलार यांना देण्यात आली आहे. ओबीसी चेहरा असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचा फायदा भाजपाला होणार आहे. यामुळे यांची वर्णी लागली आह.