⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भुसावळच्या तापमानाने फेब्रुवारीतच गाठली ‘चाळीशी’‎, यंदाचा उन्हाळा‎ ठरू शकतो रेकॉर्डब्रेक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला असून भुसावळ‎ शहराच्या तापमानाने यंदा‎ मार्चऐवजी फेब्रुवारी अखेरच‎ चाळिशी गाठली आहे. ही स्थिती पाहता यंदाचा‎ उन्हाळा शहरासाठी असह्य ठरू‎ शकतो, असा अंदाज आहे.‎

गेल्या तीन‎ दिवसांपासून भुसावळ शहराचे कमाल‎ तापमान ४० अंशांवर असल्याची‎ नोंद केंद्रीय जल आयोगाच्या‎ कार्यालयात झाली. वाढत्या‎ तापमानाचा परिणाम जनजीवनावर‎ होऊन दुपारी शहरातील रस्त्यांवर‎ सामसूम दिसते. यंदा उन्हाळा‎ देखील रेकॉर्डब्रेक ठरू शकतो,‎ असा केंद्रीय जल आयोग‎ कार्यालयाचा अंदाज आहे.‎

गेल्या दोन वर्षांपासून तर शहरात ४६ अंश‎ एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद‎ होत आहे. साधारण मार्च‎ महिन्याच्या दुसऱ्या‎ आठवड्यापासून तापमान वाढून‎ चाळिशी पर्यंत जाते. यंदा मात्र‎ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या‎ आठवड्यातच तापमानाने चाळिशी‎ गाठली आहे. तत्पूर्वी, २२ फेब्रुवारीपासून शहराच्या तापमानात‎ बदल झाला. २२ फेब्रुवारीला किमान‎ तापमान १४.५ अंश होते. २३ पासून‎ यात सरासरी दोन अंशांची वाढ‎ झाली. कमाल तापमानही दोन‎ अंशांनी वाढचले. २२ फेब्रुवारीला‎ कमाल तापमान ३८.७, तर २४ला‎ त्याने चाळिशी गाठल्याची नोंद‎ केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात‎ झाली. ही स्थिती पाहता यंदाचा‎ उन्हाळा शहरासाठी असह्य ठरू‎ शकतो, असा अंदाज आहे.‎

किमान तापमान ६ अंशांनी वाढणार‎ भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राच्या अंदाजानुसार येत्या २‎ मार्चपर्यंत जिल्ह्याचे कमाल तापमान सरासरी ३६ ते ३७ अंशांपर्यंत राहील.‎ मात्र, शनिवारी १२ अंश असलेले किमान तापमान पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने‎ वाढून १८ अंशांपर्यंत पोहोचेल. या कालावधीत वाऱ्याचा वेग सरासरी ८ ते ११‎ किमी प्रतिसाद असेल. ८ मार्चपर्यंत हवामान कोरडे राहील.‎

हे देखील वाचा :