जळगाव जिल्हा

भुसावळ तापी परिसरात रेखांकित गवती वटवटयाचे दर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रातील गवताळ बेटावर रेखांकित गवती वटवटया Striated Grassbird ( Megalurus palustris) या पक्ष्याची आम्ही प्रथमच नोंद केली. त्याच वेळी त्याचा फोटो आणि मुख्यत्वे आवाज दोन्ही मिळाले. या पक्ष्याची प्रजात ही रेखांकित गवती वटवटया असल्याची खात्री eBird चे पक्षी तज्ञ अभिजीत आवटे यांनी दिली.

त्याचा आवाज हाbreeding Song असून विणीचा हंगाम सुरू झाल्याचे ते द्योतक असल्याची माहिती पक्षी अभ्यासक गिरीश जठार यांनी दिली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. या पूर्वी पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे यांनी BTPS या भागात याची नोंद घेतलेली आहे. तर आम्ही भुसावळ शहाराजवळ याची नोंद घेतली. रेकॉर्ड केलेला त्याचा आवाज हा breeding Song आहे हे स्पष्ट झाल्यामुळे याचा अर्थ असा होतो की अन्य स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे हा हिवाळी पाहुणा नसून आपल्या जळगांव जिल्ह्यात तापी नदी काठच्या परिसरात त्याचा निवास असून त्याची नियमित वीण देखील होते आहे याला पुष्टी मिळत असल्याचे पक्षी अभ्यासक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले.

भारतातील मध्य भारतात तसेच हिमालय पायथ्याचा उत्तर पूर्व पट्टा आणि आपल्या आसाम, मणीपुर अशा सेव्हन सिस्टर प्रांतात गवताळ, झुडपी व दलद्लीच्या प्रदेशात निवासी आहे. याशिवाय भारतीय उपखंडातील बांग्लादेश, कंबोडिया,चीन, इंडोनेशिया,लाओस,मलेशिया,म्यानमार,नेपाळ,पाकिस्तान,थायलंड,व्हिएतनाम,फिलिपाईन्स या देशात आढळतो. डोके आणि गळ्याखाली छातीवर उभ्या रेषा आणि तपकिरी पंखांवर काळ्या ठळक रेषा,पांढरी भुवई आणि अन्य वटवट्यांच्या तुलनेत याची शेपटी लांब असते. नर-मादी दिसायला एकसारखे असतात.फक्त नर मादी पेक्षा आकाराने थोडा मोठा असतो. मुख्य अन्न म्हणजे गोगलगायी,छोटे कोळी,कीटक व त्यांच्या अळ्या हे असते. गवताची पाती व अन्य साहित्य वापरुन हा चेंडू सारखे गोल आकाराचे घरटे तो करतो अशी माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button