⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

‘या’ तारखेपासून भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस पुन्हा धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । सामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारी 11025 आणि 11026 क्रमांकाची भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. मात्र आता ही गाडी 1 एप्रिलपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या गाड्यांना थांबा देण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. कर्जत रेल्वे स्थानकात रेल्वे रिमोल्डिंगचे काम २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान हाती घेण्यात आले होते. यासाठी भुसावळ- पुणे हुतात्मा एक्सप्रेस तब्बल दोन महिन्यापासून बंद होती. ही गाडी आता पुन्हा एक एप्रिलपासून सुरु होणार आहे.

पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस ही भुसावळसह जळगाव, पाचोरा आणि चाळीसगाव स्थानकांवरून कल्याणमार्गे पुणे येथे जाण्यासाठी अतिशय महत्वाची गाडी आहे. या ट्रेनमुळे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची सुविधा होत असते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून ही गाडी बंद असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

संपर्क क्रांतीला थांबा

नांदेड निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस या साप्ताहिक गाडीला ४ एप्रिलपासून भुसावळ स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे. गाडी जळगावनंतर थेट भोपाळ येथे थांबत होती.