भुसावळ ३ तलवारीसह पहाटे तरुणाच्या मुसक्या आवळल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । भुसावळ शहरातील एका भागातील तरुण तलवार, घातक शस्त्र बाळगत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी पहाटे कारवाई केली. यात गुलाम गौस कालू शहा (वय २३) या तरुणाकडे तीन तलवारी जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल झाला.
मुस्लिम कॉलनी भागातील संशयित गुलाम गौस याच्याकडे घातक शस्त्र असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार एएसआय शरिफोद्दीन काझी, हवालदार जावेद हकीम शहा, सचिन पोळ, अक्षय चव्हाण व योगेश माळी यांच्या पथकाने बुधवारी (दि.३०) पहाटे संशयिताच्या घरी छापा टाकून तपासणी केली. या कारवाईत घराच्या गच्चीवरून तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. गुलाम गौस यास अटक करुन भुसावळ बाजारपेठ पोलिसांत हवालदार जावेद हकीम शहा यांच्या फिर्यादीनुसार आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल झाला