जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून दोन दिग्गज नेत्यांसह 11 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भुसावळ नगरपालिकेतील दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाल्याचे मानले जात आहे.

प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल संतोष चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या प्रवेशामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षप्रवेशात यांचा समावेश
गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या प्रवेशानंतर भुसावळ नगरपालिकेतील आणखी नगरसेवकांनीही शिवसेनेची वाट धरली. यामध्ये गटनेते सचिन चौधरी, इक्बाल शेख, उल्हास पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन पाटील, अकील पिंजारी, शबाना खान, पुष्पा चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे.
भुसावळ नगरपालिकेतील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे










