⁠ 
रविवार, मे 5, 2024

आमदार पाटील यांच्या हस्ते तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी ३.५० कोटी च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. वढोदा, तालखेडा, पारंबी, मोरझिरा व दुई येथील विकासकामांचा भुमिपुजन सोहळा दि ३० रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. तसेच महाराजस्व अभियानांतर्गत हलखेडा व इतर आदीवासी गावांत तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.

वढोदा येथे नाबार्ड योजनेतर्गत पुल बांधकाम करणे, नाविण्यपुर्ण योजनेंतर्गत सरंक्षण भिंत बांधकाम, २५१५ योजनेंतर्गत नवे तालखेड ते जुने तावखेड दरम्यान रस्ता बांधणे, जि.प.जरसंधारण योजनेतर्गत खोद तलाव बांधणे, २५१५ योजनेतर्गत तालखेड गाव अतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे व काॅक्रीटीकरण करणे. पारंबी येथे ३०५४ योजनेतर्गत पारंबी ते हिवरा रस्ता डांबरीकरण करणे. मोरझिरा येथे डोंगरी विकास योजनेअंतर्गत अंगणवाडी बांधकाम करणे. दुई येथे अंगणवाडी बांधकामासह गटार व रस्ता काॅक्रिटीकरणाचे कामांचे भुमिपुजन करण्यात आले.

प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते बेटी बचाव बेटी पढाव चे संयोजक डॉ राजेंद्र फडके, माजी सभापती तथा सदस्य विनोद पाटील, राष्ट्रवादी चे माजी सभापती अनंतराव देशमुख, वढोदा सरपंच सपना खिरोळकर, काॅग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, डॉ विष्णु रोटे, राजु शर्मा, बाळासाहेब पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, मुक्ताईनगर शहर प्रमुख गणेश टोंगे,युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, नगरसेवक मुकेश वानखेडे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा: