⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

सुकळी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; दलित वस्तीतील कामाबाबत थेट ‘सीईओ’कडे तक्रार!

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२३ । दलित वस्तीतर्गत मंजुर असलेले पेव्हर ब्लॉक चे उर्वरित काम इतरत्र ठिकाणी केल्याने दलित बांधवाची थेट सीईओ कडे तक्रार दाखल. मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी ग्रामपंचायततर्गत दलित वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणेची कामे पुर्णपणे न करता उर्वरीत काम गावात अन्य ठिकाणी करण्यात आली.यामुळे दलित बांधव प्रदिप सोनवणे यांनी स्थानिक पातळीवर तक्रारी दाखल केल्या मात्र स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने सोनवणे यांची सीईओ कडे तक्रार दाखल झाली आहे.

तालुक्यातील मौजे सुकळी येथील दलित वस्तीत सुमारे वीस लाख रुपयांची रस्ता काॅक्रिटीकरण,गटार बांधकाम व पेव्हर ब्लाॅक बसविणेची कामे मंजुर होती.दरम्यान गटारी बाांधकाम व रस्ता काॅक्रिटीकरण झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर पेव्हर ब्लाॅक बसविले याशिवाय अर्ध्यापेक्षा जास्त काम दलित वस्ती व्यतिरीक्त अन्य ठिकाणी करण्यात आले असल्याचा सनसनाटी आरोप दलित बांधव प्रदिप सोनवणे यांनी केला आहे.

तथापी सोनवणे यांनी स्थानिक पातळीवर याबाबतच्या तक्रारी केल्या मात्र दखल घेतली गेली नाही.कामाची साधी चौकशी करण्यासाठीही गटविकास अधिकारी यांनी तसदी घेतली नसल्याचे आढळुन आले आहे. यामुळे प्रदिप सोनवणे यांनी जि.प.उपमुख्य कार्यकरी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे . दरम्यान “जळगांव लाईव्ह न्युज”घ्या प्रतिनिधींनी गटविकास अधिकारी यांच्याकडे अधिक मागितली असता गटविकास अधिकारी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असुन ‘मी प्रत्यक्ष कामावर पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. सदर कामाची चौकशी होऊन संबंधितांवर काय कारवाई करण्यात येईल? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे.