⁠ 
शनिवार, मे 18, 2024

प्रवाशांनो लक्ष द्या ! वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू ‘या’ तारखेला रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । सध्या उन्हाळी सुट्या असल्यानं रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यातच भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, ६ मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आहे. यामुळे वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सहा अन्य एक्स्प्रेस गाड्या रेग्यूलेट करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या भूसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून शनिवारी जारी पत्रकानुसार, नांदुरा ते जलंब स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, ६ मे रोजी अप व डाऊन मार्गावर १४:२० ते १६:६० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १११२१ व १११२२ वर्धा- भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ०१२१२ व ०१२१२ नाशिक-बडनेरा-नाशिक मेमू ६ मे रोजी प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या केल्या रेग्यूलेट
०७११६ जयपूर-हैदराबाद विशेष – ०२. ४५ तास
२०८०४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस – ०२.०० तास
०११४० मडगांव-नागपूर विशेष – ०१.४५ तास
११०४० गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस – ०१.०० तास
०१३६६ बडनेरा-भुसावळ मेमू – ०१.१० तास
१२४८५ नांदेड-श्री गंगानगर एक्स्प्रेस – ००. ३५ मिनिटे