जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । जळगावात बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आणखी एका संशयिताला अकोला येथून ताब्यात घेण्यात आले आहे. प्रमोद किसनराव कापसे असे अकोला येथून अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यासह इतर ठिकाणी अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

बीएचआर घोटाळ्यात अकोला येथील प्रमोद कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी सात आरोपींना अटक केल्यानंतर तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई) अशा अटक केलेल्या व्यक्तींची नाव आहेत. तत्पूर्वी पुण्यातील रिटझ कार्लटॉन या हॉटेलमधून ताब्यात घेतले होते.