⁠ 
शनिवार, मे 4, 2024

एरंडोलला विविध विकास कामांचे भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथे कब्रस्तानामध्ये शेड बांधकाम करणे, जय गुरु व्यायामशाळा परिसरात लादीकरण करणे, सामाजिक सभागृह परिसरात काँक्रिटीकरण लादीकरण गटार बांधकाम करणे, रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, स्मशानभूमी विकसित करणे, पुरे भागात मारुती मंदिराला संरक्षण भिंत बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहर प्रमुख आनंदा चौधरी, तालुका संघटक बबलू पाटील, कृष्णा ओतारी, मयूर महाजन, मुख्याधिकारी विकास नवाळे, उपअभियंता अक्षय पगारे, शाखा अभियंता नितीन पाटील, चिंतामण पाटील, शरद ठाकूर, चंदनसिंग जोहरी, योगेश चौधरी, अमजद पठाण आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.