जळगाव जिल्हा

भोंगऱ्या… कुर्रर! १२ महिन्यांनी आली होळीबाई, भोंगऱ्या उत्सवाला सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । भोंगऱ्या… कुर्रर हा नाचताना गाताना वापरला जाणारा स्पुर्ती शब्द आहे. काय गाऊ आणि काय राहू देऊ होळीची महिमा अपरंमपार आहे. बारा महिन्यांनी आली होळीबाई. बारा महीन्यानी आली! मेळा, भोंगऱ्या सोबत घेऊन आली होळीबाई…

सातपुडा परिसरातील आदिवासींचा सर्वात महत्वाचा सण होळी समजला जातो. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील आदिवासींच्या जीवनात होळी सणाला मुख्य स्थान मानले जाते. दुसरी गोष्ट अशी की, आदिवासींची होळी म्हणजे हिंदु संस्कृतीची ‘होली का’ नाही. आदिवासी निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग नियमांनी जगणारा समाज आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृती, जन्म, मरण, सण उत्सव हिंदुसारखे नाही. त्यांची स्वतंत्र जीवनशैली आहे. तसेच होळी’चे देखील स्वतंत्र अस्तित्व आहे.

आदिवासींची होळी म्हणजे नुसते नाचणे, गाणेही नाही तर सांस्कृतिक वैभव आणि लोकशाही जीवन मुल्यांनी भरलेला हा सण आहे. श्रम, समूह, बंधूत, प्रेम, विश्वास, सहकार्य अशी मानवी मुल्य आहेत. होळीच्या निमीत्ताने ही मानवी मुल्य आदिवासी जतन संवर्धन करत एका पिढीकडून दुसऱ्या पीढीला सहज वाजत, गाजत, नाचत ही मुल्य सुपूर्त करत असतो. निसर्गातील नव चैतन्या बरोबरच आदिवासींच्या जीवनात उत्कटपणे उत्साहाने भरलेले नवचैतन्य होळीसोबत येत असते. गीत, पौराणिक कथा, नृत्य, संगीत असे वेगवेगळ्या प्रकारेचे कलाविधी जीवन दर्शन भोंगर्या होळीत पाहायला मिळते. 
               
आदिवासींची पौराणिक कथेत होळी, भोंगऱ्याबाबत आजही मौखिक स्वरुपात इतिहास सांगितला जातो. ज्यात होळी आणि दिवाळी ह्या दोन बहिणी असल्याचे सांगितले जाते. होळीचे दोन मुले म्हणजे भोंगऱ्या आणि मेळा असल्याचे या पौराणिक कथेत सांगितले आहे. ‘त्या’ निमीत्ताने हे सण साजरी केले जातात. होळी अगोदरच्या महिन्यात चांद दिसला की स्पुर्तीने कुर्रर…अशी आरोळी देवून ढोल, मांदलवर थाप मारून होळीचा दांडा रोवला जातो. ‘त्या’ महिन्याला आदिवासी ‘दांडाचा महिना’ म्हणतात. दांडा होळी महिन्यापुर्वीच आदिवासी शेतातील सर्व कामे आवरून घेतात. दांडा महिनानंतर एक महिन्याना होळी असते. होळीतील घुट आणि बुरोगली संपेपर्यंत कुठलाही लग्न-सण उत्सव साजरी केला जात नाही तसेच घर बांधले जात नाही.

होळीत नाचनारे बावा, बुद्या, गेऱ्या, राय, काली पाव्वी (होळीची आचार संहिता) नित्य नियमाने पाळतात. ज्यात होळीत नाचणारे गेर (नृत्य) करणारे खाटवर बसत नाही. बाईला सावली देखील अंगावर पडू देत नाही. गेर बनणारे होळी येईपर्यंत गावाच्या बाहेर राहतात. होळीचा दांडा रोवला की, परिसरात सर्वत्र होळीची तयारी सुरू होते. दररोज रात्री खळ्यावर ढोल-मांदल पावीचा सूर परिसरात निनादत असतो. सातपुडा परिसरातील आदिवासी जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल दांडानंतर तो होळीची आतुरतेने वाट पाहत असतो. वृद्धापासून ते लहान मोठे प्रत्येकजण होळीच्या चाहूल ने पळस फुलांप्रमाने ऊत्साहाने फुलून जात असतो. चातक पक्षाप्रमाणे भोंगऱ्या, होळी मेळादाची वाट पाहत असतो. 
           
होळी सण अगोदरचा येणारा आठवडे बाजार हाट म्हणजे ‘भोंगऱ्या हाट’ मध्य प्रदेशातील खेतिया, पानसेमल, बडवानी, झाबुआ, अलिराजपुर तर महाराष्ट्रातील धडगांव, तोरणमाळ, फलाई, म्हसावद गुजरात राज्यातील कवाठ, पावी जेतपूर, झाब, तेलवमाता तसेच राजस्थान परिसरातील काही क्षेत्रांत अनेक ठिकाणचे भोंगऱ्या हाट प्रसिद्ध आहेत. ज्यात परिसरातील आदिवासी ढोल, मांदल, घेवून मोठ्या संख्येने एकत्र येतात. होळीला लागणारे सर्व सामान भोंगऱ्यात खरिदी करतात. भोंगऱ्या हाटात सगळे बांधव आपापल्या गावातील होळीचा नेवता (निमंत्रण) देतात. बऱ्याच महिन्यात भोंगऱ्या निमित्ताने आदिवासी एकमेकांना आपासात भेटतात. त्यामूळे खुशीत पान खाऊ घालतात. एकमेकांनासोबत आपले सुख दुख व्यक्त करतात. यात सर्व वृद्द, तरुण-तरुणी येतात समतेने एकत्र नाचतात गातात. भोंगऱ्या हाट मध्ये हाट बरोबर ढोल, मांदळ घेवून १२ वाजेच्या सुमारस जमा होतात आणि वाजत, गाजत मोठी मिरवणुक काढली जाते. या मिरवणुकला देखील खुपच महत्व आहे. या मिरवणुकीला ‘मेवू ‘(मेळा) असे म्हणतात. आसपासच्या परिसरातील शंबर दीडशे हून अधिक ढोल असतात. परंतू भोंगऱ्या हाटच्या मेळ्यात प्रथम फिरण्याचा मान विषेश रुतबा, मान असलेल्या गावालाच असतो, बाकी त्यांच्या मागे असतात. ‘त्या’ ‘त्या’ गावातील कारबारी, पाटिल पंच आपल्या पारंपरिक पेहरावात तसेच वाद्य, नृत्य सोबत घेऊन हातात पारंपरिक शस्र आणि पळस फुलांचा गुच्छा, जांबळाची लहान, लहान फांदी देखील मेळात घेवून लोकं नाचतात. 
  
सणाबाबत गैरसमज

भोंगऱ्या सणाबाबत अनेक गैरसमजुती आहेत. त्यात आदीवासी मुले मुलींना पळवून नेतात, लग्न करतात, असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात भोंगऱ्या सणात महिनाभर तरी आदिवासी बांधव साखरपुडा, विवाह करत नाहीत. या बाबींना आदिवासी बांधव अशुभ मानतात. चुकून असा प्रकार घडला तर जातपंचायत दंड करते.

      
 

Related Articles

Back to top button