⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

दुर्दैवी! अपघातात ट्रकच्या चाकाखाली अडकल्याने कीर्तनकाराचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून याचदरम्यान, पाचोरा येथून कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर बांभोरी (ता. धरणगाव) येथे बहिणीकडे जाण्यासाठी निघालेले कीर्तनकार यांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर ते ट्रकखाली अडकले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. कैलास प्रकाश कोळी (२२, रा. खर्डी, ता. चोपडा) असे मयत कीर्तनकार यांचे नाव असून ही घटना शिरसोली ते जळगावदरम्यान सेंट सा शाळेजवळ घडली.

या अपघाताच्या ठिकाणी ट्रकखाली अडकून पडलेल्या अपघातग्रस्तास बाहेर काढण्यासाठी २५० ते ३०० नागरिकांनी थांबून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, कीर्तनकारावर काळाने झडप घातलीच.चोपडा तालुक्यातील खर्डी येथील रहिवासी असलेले कैलास कोळी हे कीर्तनकार होते. शनिवार, २३ डिसेंबर रोजी पाचोरा येथे त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता. रात्री कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने बांभोरी येथे बहिणीकडे जात होते. त्यावेळी जळगावकडे येत असताना वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

त्यानंतर ते गॅस लिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली जाऊन अडकले. हा अपघात इतका भीषण होता की कोळी यांचा एक पाय त्यांच्या शरीरापासून वेगळा झाला. कोळी हे ट्रकच्या चाकाखाली अडकलेले असताना ट्रकचालक घटनास्थळावरून पळाला. ट्रकमध्ये सिलिंडर असल्यामुळे तो मागे व व पुढे होत नसल्याने तब्बल एक तास कोळी हे ट्रकच्या चाकाखाली अडकलेले होते. यादरम्यान प्रत्येक जण आपापल्या परीने शर्थीचे प्रयल करीत होता.