⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात निघाली जम्बो भरती ; जळगावात ‘इतक्या’ जागा रिक्त

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात निघाली जम्बो भरती ; जळगावात ‘इतक्या’ जागा रिक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राज्यातील युवकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी नवीन मेगाभरती होणार आहे. एकूण 4539 पदांसाठी अधिसुचना जाहीर होणार असून अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. Maharashtra District Court Bharti 2023

यामध्ये जळगाव जिल्हा न्यायालयात 150 हुन अधिक जागांवर भरती होईल. 7वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ही सरकारी नोकरीची उत्तम संधी असेल. Maharashtra District Court Recruitment 2023

पदाचे नाव :
लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती होईल.

शैक्षणिक पात्रता:
लघुलेखक (निम्नश्रेणी):
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व मराठी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iv) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
कनिष्ठ लिपिक: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. (iii) D.O.E.A.C.C./ N.I.E.L.I.T./ CDAC/MS-CIT
शिपाई/ हमाल: 7 वी उत्तीर्ण व चांगली शरीरयष्टी.
(वरील शैक्षणिक पात्रता 2018 च्या भरतीनुसार आहे. यात बदल असू शकतो)

पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 : 38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज शुल्क: लवकरच अपडेट करा.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.

जाहिरात पहा : PDF

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.