भरधाव दुचाकी बैलगाडीवर आदळली; एक ठार, एक गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । धरणगाव तालुक्यातील साकरे ते कंडारी बु येथे बैलगाडीला मागून दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला.

accident 23 jpg webp

उत्तम तुकाराम भिल ( वय ५० रा. कंडारी बु ता. धरणगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम भिल यांचा मुलगा विजय उत्तम भिल व त्याचा मित्र सोमनाथ रोहीदास भिल हे विजय चालवित असलेल्या मोटारसायकल (क्रं. एमएच१९ एजी ४१९७) ने कंडारी बु. येथे घरी येत होते. यावेळी राजेंद्र पाटील हे बैलगाडीने रस्त्याने जात असतांना त्यांच्या शेताजवळ विजय उत्तम भिल याने त्याचा ताब्यातील मोटरसायकल रस्त्याचा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बैलगाडीस मागून धडक मारली. यात दुचाकीवरून पडल्याने विजयच्या डोक्याला, तोंडाला, छातीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सोमनाथ रोहीदास भिल हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात मयत विजय उत्तम भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now