भरधाव ट्रकचा दुचाकीला कट; अपघातात दोन गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । चिंचपुरा ते पिंप्री गावादरम्यान मद्यधुंद ट्रक चालकाने दुचाकीला कट मारल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना २४ रोजी घडली. या अपघातानंतर आयशरदेखील रस्त्यालगत कलंडली.

accident 20

शेख इमरान शेख बिस्मिल्ला (वय २५, रा. रथ चौक, बालाजी मंदिर, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ रोजी आयशरचालक त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून घाईघाईने चालवत होता. यातच आयशरने (क्र. एम.एच.०४-एच.डी.८७०२), शेख इमरान यांच्या दुचाकीला (क्र.एम.एच.-१९-ए.क्यू.२७८६) हुलकावणी दिली.

त्यामुळे शेख इमरान यांच्या डोक्यास डाव्या बाजूस व डाव्या गालावर पत्रा लागला. तसेच शेख इमरान यांच्या आईला उजव्या पायाला मार लागून त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर आयशरदेखील कलंडली. अपघातानंतर आयशरचालक पसार झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now