भारत जोडो पदयात्रा : अमळनेरला काँग्रेसची नियोजन बैठक संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । काँग्रेसचे खा.राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ सुरु असून ते महाराष्ट्रात दाखल झाले आहे. शेगाव येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष तथा भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक संदीपभय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर येथे नियोजन बैठक पार पडली.

शहर अध्यक्ष मनोज पाटील यांनी ग्रामीण व शहरातुन यात्रेसाठीचे नियोजना संदर्भात माहिती देताना शहर तसेच ग्रामीण भागातील गणा गणातून दोघे मिळुन अंदाजे 20 एसटी बसेस भरून जाण्याचा निर्धार व तसे कार्यकर्त्यांनी नियोजन केले असल्याचे सांगितले. त्यानुसार कार्येकर्ते कामाला लागले असुन दि. 13 नोव्हेंबर पर्यंत सर्व नियोजन होण्याचे अश्वासन अध्यक्षांना दिले. जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून केलेल्या नियोजना बाबत माहिती देतांना कार्यकर्त्यांना सभेसाठी नेताना चोक व्यवस्था करण्या बाबत निर्देश देत जिल्हा काँग्रेस कडुन आवश्यक ती केली जाईल याची शाश्वती दिली.

यावेळी मोदी सरकार ने केलेल्या नोटबंदी चा काळा दिवस म्हणुन काँग्रेस मानवत असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला. या वेळी माजी अध्यक्ष संदीपभय्या यांनी शेगाव सभेसाठी लाखोंने गर्दी होणार असल्याने सगळ्यांनी काजीपूर्वक नियोजन करण्यास सांगितले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी राहुलजी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वानी एकजुटीने कामाला लागण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगीजिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, अजबराव पाटील, तालुका भारत जोडी समन्वयक राजेन्द्र पाटील, पारोळा शहर अध्यक्ष भिकन अहिरे, महिला जिल्हाअध्यक्ष सुलोचना वाघ, पारोळा महिला अध्यक्ष कल्पनाताई, जिल्हा ओबीसी सेंल अध्यक्ष डी डी पाटील तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, बी के सूर्यवंशी, श्याम पवार, शांताराम बापु, लोटन चौधरी, प्रविण जैन, महेश पाटील, तुषार संधानशिव, जुबेर पठाण, तौसिफ तेली, इम्रान कादर, बन्सीलाल भागवत, गजेंद्र साळुंखे, जयवंत आबा, आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्र संचालन मनोज पाटील आभार गोकुळ बोरसे यांनी मानले.