भाग्यश्री पाटीलने रचला इतिहास, राष्ट्रीय बुद्धिबळात चौथ्यांदा विजयी
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । भुवनेशवर येथे ३२वी १७ वर्ष वयोगटाच्या राष्ट्रीय अजिंक्य निवड बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडली. यात जळगावची पाचोरा एम.एम.कॉलेज ची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील हिने भारतात इतिहास घडवत चौथ्यांदा राष्ट्रीय विजेती होण्याचा मान पटकाविला आहे.
या स्पर्धेत देश भरातील ५६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा स्विस-लीग पद्धतीने ११ फेऱ्यात घेण्यात आली. यात भाग्यश्रीने ७ विजय तर ४ बरोबरी असे अपराजित रहात ९ गुण मिळवत विजेते पद आपल्या नावे केले. तर दुसरा क्रमांक स्नेहा हलदर (पश्चिम बंगाल), तिसरा क्रमांक तेजस्विनी जी (तमिळनाडू) यांनी पटकाविला.
भाग्यश्रीने खालील स्पर्धकांना हरविले- काव्यश्री टी वि एस (आंध्रप्रदेश), WCM करिती मयूर पटेल (महाराष्ट्र), वाकचेरी मोहिथा (अंधरप्रदेश), खैरमोडे धनश्री (महाराष्ट्र), सानिया रफिक तडवी (महाराष्ट्र), WCM खिर्थी गंटा (तेलंगणा), WCM चिन्नम वैष्णवी (आंध्रप्रदेश). या स्पर्धकांसोबत बरोबरी साधली – स्नेहा हलदर (पश्चिम बंगाल), तेजस्विनी जी (तामिळनाडू), WIM रक्षिता रवी (तमिळनाडू), इश्वी अग्रवाल (हरियाणा).
या आधी भाग्यश्री तीन वेळा राष्ट्रे विजेती ठरली आहे. तसेच नॅशनल स्कुल ला गोल्ड मेडल, कॉमनवेल्थ स्पर्धेत तीन वेळा सिल्वर मेडल, वेस्टर्न आशियाई स्पर्धेत रॅपिड व ब्लिट्झ मध्ये गोल्ड, आशियाई स्कुल स्पर्धेत क्लासिक ला सिल्वर, रॅपिड ला ब्रॉंझ तर ब्लिट्झ गोल्ड, आशियाई युथ स्पर्धेत रॅपिड ला सिल्वर, ब्लिट्झ ला गोल्ड, जागतिक ८ वयोगटाच्या क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत ज्यात ७७ देशांचा सहभाग होता त्यात ब्रॉंझ मेडल असे राष्ट्रीय १६ व आंतरराष्ट्रीय १३ असे एकूण २९ मेडल्स मिळवत भाग्यश्रीने भारताची मान उंचावली आहे. या स्पर्धेत ९० हजार रु. रोक रक्मे सोबत आशियाई व जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.
भाग्यश्रीच्या या यश बद्दल तिचे जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ सन्घटनेचे अध्यक्ष सिद्धार्त मयूर, सचिव निरंजन गोडबोले, नाशिक बुद्धिबळ सन्घटनेचे अध्यक्ष विनय बेले, सचिव सुनील शर्मा, अहमदनगर बुद्दीबळ सन्घटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सचिव यशवन्त बापट, पाचोरा एम. एम. कॉलेजचे चेयरमन संजय वाघ, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी अभिनंदन केले.