⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

दहशतवाद सुरूच; कारवाईसाठी जाणाऱ्या तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसात वाळूमाफियांकडून अधिकाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याचे प्रकार समोर आले. यानंतरही वाळूमाफियांची मुजोरी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. यातच गिरणा पात्रातून निमखेडीमार्गे अवैध वाळू वाहतुकीवरील कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदार शीतल राजपूत यांच्या शासकीय वाहनाचा आठ ते दहा दुचाकीस्वारांनी पाठलाग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारचा व्हिडिओ जिल्हा प्रशासनाने व्हायरल करत असल्या दबावाला आम्ही बळी पडणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. पाठलाग करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

तहसीलदारांच्या पथकाने मंगळवारी निमखेडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. कारवाईला जात असताना तहसीलदारांच्या वाहनाचा पाठलाग होत असतानाचे चित्रीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सोशल मीडिया खात्यावर टाकण्यात आले. सकाळच्या गस्तीचा हा व्हिडिओ असून एवढ्या सकाळी शासकीय वाहनासोबत या दुचाकी धावत असल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या पथकाला धमकावण्याचा प्रयत्नही असू शकतो. अशा गस्तमध्ये अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालतात. या बदल्यात खोट्या तक्रारी दाखल केल्या जाणे आणि सोशल मीडिया ट्रोलिंगच्या स्वरूपात मानसिक छळाचा सामना त्यांना करावा लागतो. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी असे हल्ले धमक्या आणि धमकावूनही कर्तव्य बजावत राहतील. दबावाला बळी पडणार नसल्याचेही तो व्हिडिओ पोस्ट करताना नमूद केले आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनीही, तहसीलदारांच्या वाहनाचा पाठलाग होत असल्याबाबतचा व्हिडिओ प्राप्त झालेला आहे. त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल’ असे सांगितले