⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

भडगाव तहसीलमध्ये अनागोंदी कारभार, प्रतिज्ञापत्रावर सहीसाठी मोजावे लागतात पैसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । शाळा महाविद्यालयातील शैक्षणिक कागदपत्र असो, शेतातील वारस, वाटणी पत्र,कागदपत्र गहाळ, वंशावळ असो असे अनेक कागदपत्रांसाठी विद्यार्थी नागरिकांना व वृध्दांना स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र करून त्याला अफिडेविट करून त्यावर तहसील कार्यालयातील ट्रेझरी अव्वल कारकून याची सही शिक्का घ्यावा लागतो. परंतु या सर्व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सर्व कागदपत्र पात्रांची पूर्तता करून सुद्धा शेवटी सहीसाठी पैश्यांची मागणी होताना दिसते.

भडगाव तहसील कार्यालयात हा अनागोंदी कारभार सुरू असून या बाबत भडगाव तहसीलदार यांचे या बाबत दुर्लक्ष होत आहे. भडगाव तहसील कार्यालय येथे सी. सी. टी.व्ही. च्या नजरेत हा टेबल ठेवावा व ज्या नागरिकाचे प्रतिज्ञापत्र आहे अश्या व्यक्तीलाच सही द्यावी तसेच खुलेआम पैश्यांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तहसीलदार यांचे दुर्लक्ष कसे यावर काही कारवाई होणार की नाही अशी मागणी होत आहे.