⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सावधान ! जळगाव शहरात गेल्या २१ महिन्यात १०१ ठिकाणी लागली आग

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । गेल्या जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान शहरात तब्बल १०१ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. पर्यायी लागलेल्या आगीं मुळे सुमारे १२ कोटींचे नुकसान झाले आहे. विजेच्या तांत्रिक कारणांनी कित्येक ठिकाणी आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. मनपाच्या अग्निशामन दलाच्या पथकाने धाव घेत या आगी आटोक्यात आणल्या आहेत. रस्त्यांवर धावणाऱ्या चारचाकींनाही आग लागल्याने त्याही जळून खाक झाल्याची घटना शहरात घडल्या आहेत.

जळगाव शहरात गेल्या २१ महिन्यात १०९ आगींची नोंद आहे. यात सर्वाधिक आग हि व्यावसायिक दुकानांना लागली आहे. डिसेंबर महिन्यात २ ठिकाणी आग लागली आहे. त्यात एका वाहनाचा समावेश आहे.

१२ कोटींचे साहित्य खाक
कापड दुकान, भंगार, इलेक्ट्रोनिक्स उपकरणांच्या दुकानांसह अन्य व्यावसायिकांना आगीचा चटका बसला आहे. यामुळे १२ कोटीपर्यंतचे नुकसान झाले आहे.

भंगार दुकाने व वाहने सर्वाधिक खाक

या आगीमध्ये सर्वाधिक भंगाराची दुकाने व एलपीजी वाहन भक्ष्यस्थानी पडले आहेत. कापड दुकाने खाक तर भंगाराच्या दुकानातील काही माल विझवण्यात यश आले आहे. बहुतांशी आग लागण्यामागे शॉर्टसर्किट कारणीभूत असल्याचे स्पष्ट आले आहे. अनेकांच्या व्यावसायिक दुकानात विद्युत यंत्रणेचे अद्यावतीकरण न केल्याने या आगी लागल्याचे उघड झाले आहे.