जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२५ । भारतात मार्च महिन्यापासूनच उन्हाळा सुरु होतो. एप्रिल आणि मे महिन्यात भाजून काढणारे ऊन पडते. यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक जण आल्हाददायक आणि आरामदायी ठिकाणी सहलींचे नियोजन करतात. बहुतेक लोक फक्त हिल स्टेशनकडे वळतात. जर एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला एप्रिल महिन्यात फिरायला जाण्याचे ठिकाणे सांगणार आहोत. जे तुम्हाला थंड अनुभव आणि सुंदर दृश्यांचा आनंद देईल.

शिमला

जर तुम्हाला पर्वतांची थंड हवा आणि हिरवळ आवडत असेल तर तुम्ही हिमाचलला जाऊ शकता. या हिल स्टेशन्सवर जाणे तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नसेल. एप्रिलमध्ये येथील हवामान खूपच रोमँटिक असते. हिरव्यागार दऱ्या तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकतात.
मनाली

एप्रिल महिना हा मनालीमध्ये वसंत ऋतूच्या आगमनाचा महिना आहे. त्यामुळे हिमालयीन स्वर्गातील या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो. एप्रिलमध्ये सरासरी तापमान ५°C ते १५°C पर्यंत जाते. येथे दिवस आल्हाददायक असतात तसेच रात्री थंड असतात.
काश्मीर

एप्रिलमध्ये तुम्ही काश्मीरला येऊ शकता आणि येथील हिरव्यागार दऱ्या पाहू शकता. तुम्हाला इथे येऊन कळेल की त्याला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ का म्हणतात. पावसाळा वगळता तुम्ही कधीही काश्मीरला भेट देण्याचा विचार करू शकता. एप्रिल महिना हा काश्मीरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्हाला उत्साहाने भरून टाकतील.
कूर्ग

कुर्ग हे धबधबे, धुक्याचे पर्वत आणि कॉफीच्या बागांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंग सारख्या क्रियाकलापांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.
तवांग

तवांग भारतातला सगळ्यात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. याच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत. जे बघून तुम्ही खुश होणार. बर्फाने झाकलेली हिमालयाची शिखरे या ठिकाणाला आणखी सुंदर बनवतात. येथे पर्वत, जंगले आणि सुंदर तलाव आहेत.
पचमढी

एप्रिलमध्ये, तुम्ही मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन असलेल्या पचमढीलाही सहलीची योजना आखू शकता. सातपुडा टेकड्यांवर वसलेल्या पचमढीच्या शिखरावरून दिसणारे हिरवळीचे दृश्य तुम्हाला उत्साहाने भरून टाकेल. तुम्हाला ताजेतवाने वाटेल. पचमढीला आल्यावर तुम्हाला निसर्गाच्या जवळचा अनुभव येईल. पचमढीमध्ये तुम्हाला अनेक धबधबे आणि गुहा पाहायला मिळतील. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्हाला इथेही ती संधी मिळेल.
मेघालय

जर तुम्ही मेघालयाला भेट देण्याचा विचार करत असाल तर एप्रिल महिना सर्वोत्तम मानला जातो. या काळात इथे खूप थंडी नसते आणि खूप गरमही नसते. साहस आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्हाला प्रत्येक थोड्या अंतरावर धबधबे दिसतील. तथापि, काही धबधबे पाहण्यासाठी तुम्हाला लांब ट्रेकिंग करावे लागू शकते. तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला एक वेगळेच दृश्य पहायला मिळेल. याशिवाय, येथे येऊन तुम्ही जगातील सर्वात स्वच्छ गाव देखील पाहू शकता.
दार्जिलिंग

हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेले, हे ठिकाण खूप सुंदर आहे. येथे तुम्हाला टायगर हिलवरून सूर्योदयाचे अद्भुत दृश्य पाहता येते. याशिवाय, तुम्ही हिमालयीन रेल्वे (टॉय ट्रेन) मध्ये एक रोमांचक राइड देखील घेऊ शकता. एप्रिलचा महिना दार्जिलिंग फिरण्यासाठी सर्वात चांगला आहे. यादरम्यान तापमान ११ डिग्री सेल्सियस पासून १९ डिग्री सेल्सियसच्या मधात राहतो.
धर्मशाळा

प्रतयेक व्यक्तीला डोंगरावर फिरायला आवडत. चित्रपटात दाखवण्यात आलेले घाट सर्वानाच आवडतात. जर अश्या ठिकाणी जायचं असेल तर धर्मशाळा हे सर्वात छान ठिकाण आहे. धर्मशाळेला मिनी तिब्बत देखील म्हंटल गेलं आहे. तिब्बती लोक या धर्मशाळेत राहतात. इथे तिब्बती झेंडे तुम्हाला सगळीकडे दिसेल. धर्मशाळेजवळ मैक्लोडगंज आहे. डोंगरांच्या मध्ये वसलेले हे ठिकाण आनंददायी आहे.
ऊटी

ऊटी हा नाव ऐकताच मन फिरायला लागतो. चित्रपटात दाखवण्यात आलेला उटी हा प्रत्येकानी बघितला असेल. या सुंदर डोंगराळ शहरात कोणालाही जायला आवडेल.इथे आल्यावर असं वाटतं जणू कोणीतरी कॅनव्हासवर चित्र काढलं आहे. ऊटी येथील टायगर हिल आणि डोड्डाबोट्टा टेकडी येथून दिसणारा दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. तलाव आणि धबधबे देखील ऊटीचे सौंदर्य वाढवतात. जेव्हा तुम्ही चायच्या बागानां दुरून बघाल तेव्हा तुम्हाला अजून सुंदर वाटेल.
मसुरी

उत्तराखंडच्या मसुरीला ‘पहाडांची राणी’ असेही म्हणतात. एप्रिलमध्ये मसुरीमध्ये थंड वारे वाहतात. दिवसा स्कूटीवर मसुरीच्या रस्त्यांवर फिरत असताना, सोनेरी सूर्यप्रकाशातील थंड वाऱ्याची झुळूक एक अद्भुत प्रवास घडवून आणते. येथे तुम्ही लाल टिब्बा, केम्पटी फॉल, कंपनी गार्डन, दलाई हिल्सला भेट देऊ शकता.