जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या विषयावर प्रशासनाविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे, एका शिक्षकास चांगलेच महागात पडले. वारंवार सूचना देऊनही संबंधित शिक्षकाने बदनामी न थांबवल्याने, अखेर बीडीओंनी शिक्षकाचे निलंबन केले. निलंबनाचे आदेश हे पारोळा गटविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत. अशाप्रकारची कारवाई तालुक्यात प्रथमच झाली आहे.
पारोळा पंचायत समितीमधील उपशिक्षक सचिन पाटील हे वेल्हाणे येथील जि.प.शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी प्रशासकीय पदांचा नामोल्लेख करून प्रशासनाविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी, जि.प.वर्तणूक नियम १९६४, १९६७ अंतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात आली आहे. संबंधित शिक्षक वारंवार सर्व अधिकारी, शिक्षक यांच्याशी विनाकारण वाद घालणे, कार्यालयीन विषयांची सार्वजनिक ग्रुपवर चर्चा करणे अशाप्रकारे नियमांचा भंग करत होता. यापुर्वीही त्यांना लेखी व तोंडी समज देण्यात आलेली होती. तरीदेखील वर्तणुकीत कोणताही बदल न झाल्यामुळे अखेर कारवाई करण्यात आली. संबंधित शिक्षकांस वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनदेखील त्यांनी बदनामी न थांबवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येईल असेही निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा