⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.पाटील (आबा) यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील एक मुरब्बी राजकारणी तसेच समाजसेवक सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष आबासो बी.बी.पाटील यांचे रविवारी ४.४५ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर उद्या सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सहकार क्षेत्रातील एक आगळंवेगळं नेतृत्व म्हणजे म्हणजे आबासाहेब बी.बी.पाटील होय. चोपडा तालुक्यातील भार्डू हे त्यांचे जन्मगाव परंतु आबांची कर्मभूमी जळगाव शहर राहिली आहे. फार पूर्वी आबा शिवाजीनगरमध्ये राहत होते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामाचा एक वेगळा ठसा आबांनी निर्माण केला होता आबासाहेब ग.स.सोसायटीचे सहकार गटाचे नेते राहिले व अनेक वर्ष चेअरमन होते. आबांनी चोपडा सहकारी साखर कारखाना चोपडा सहकारी सूत गिरणी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या सहकारी संस्थेत संचालक म्हणून कामकाज पाहिले होते.

आबांनी आपल्या कार्यकाळात गोरगरीब होतकरू अनेक तरुण बंधू भगिनीना त्यावेळी नोकरी लावण्याच महत्त्वाचं काम केलं होतं. आबा चांगले शेतकरी देखील होते. रविवारी दुपारी ४.४५ वाजता आबांना देवाज्ञा झाली. आबांचे वय ८२ वर्षे होते.
आबांना मुलगा किरण, सून मेघा, व मुलगी दिपाली व जावई शेषराव पवार तसेच नातू व नातसुना आहेत. त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता गणेश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

हेही वाचा :