⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | मग तुम्ही महाभा*** नाही का? ; संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर मंत्री गुलाबरावांची टीका

मग तुम्ही महाभा*** नाही का? ; संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर मंत्री गुलाबरावांची टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । जळगावच्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना भाXXX असा शब्द वापरला. यामुळे राजकीय क्षेत्रात गदारोळ उठला असून संजय राऊतांच्या या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटीलांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस, त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवं, अशी बोचरी टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली आहे.

आम्हाला भाXXX हे म्हणत आहेत मग आमच्यासोबत तुम्ही युती केली होती मग तुम्ही महाभाXXX नाही का? पणं आम्ही अशी भाषा वापरणार नाही कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण आता तुम्ही अंगावर आलाच आहात तर शिंगावर घेणार, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान,बाळासाहेबांनी पान टपरीवाल्याला आमदार, मंत्री केले. पण आता या पान टपरीवाल्याला घरी बसविण्याची वेळ आली असे संजय राऊत म्हणाले यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, पान टपरीवर बसून आमदार होता येत नाही.आंदोलन केली, केसेस अंगावर घेतल्या, 24 तास जनतेची सेवा केली. पण तू काय केले? हातात पेन घेऊन सामनात अग्रलेख लिहला आणि दोनदा खासदार झाला. तुम्ही आमच्या भरोशावर खासदार झालात. पाटपरीवाला आमदार झाला तर त्यासाठी मेहनत लागते तू बिना मेहनतीचे धान्य पिकवतोय, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

त्यांच्या भाषेपेक्षा आमची अत्यंत खालच्या दर्जाची भाषा आहे पण ती आम्ही वापरणार नाही. निराश, हताश झालेलाच माणूस अशा प्रकारची वक्तव्य करु शकतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.