बापरे! जळगावात चाकूच्या धाकाने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लुटले

ऑक्टोबर 7, 2022 6:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील जिल्हा मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात चोरट्याने चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चैन जबरी हिसकावून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 14T110327.149

आरती मोतीलाल कुमावत (वय ३२, रा. पोलीस सोसायटी) या जिल्हा पोलीस मुख्यालय जळगाव येथे आपल्या परिवारासह राहतात. त्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी म्हणून नोकरीला आहे. गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात शतपावली करत असताना अंधाराचा फायदा घेत निंबाच्या झाडाजवळून एक अनोळखी चोरटा तोंडाला काळारूमाल बांधून त्याच्या मागावर आला. त्याला पाहून आरती कुमावत ह्या पळत सुटले. चोरट्याने त्यांचा पाठलाग करून त्यांचा रस्ता आडविला. त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत होता. त्यावेळी महिलेने त्यांच्या तोंडावरील रूमाल ओढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोरट्याने हातात चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चैन जबरी हिसकावून त्यांना जखमी करत पसार झाला. यात झटापटीत त्यांची अर्धी चैन तुटलेली गळ्याजवळून आढळून आली.

याप्रकरणी आरती कुमावत यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चंदेलकर करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now