⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

करोडो बँक ग्राहकांना ATM मधून पैसे काढता येणार नाहीत! काय आहे कारण जाणून घ्या?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बँकेला भेट देणाऱ्या ग्राहकांना अडचणी येऊ शकतात. कारण 28 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बँकेच्या सेवा विस्कळीत राहू शकतात. बँक युनियनने 2 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या संपामुळे एटीएममधून पैसे काढण्यापासून अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.

चार दिवस बँकिंग सेवा प्रभावित होणार आहेत
बँक युनियनने 30 आणि 31 जानेवारीला बँक संपाची घोषणा केली आहे. यासोबतच 28 जानेवारी हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. दुसरीकडे, 29 जानेवारीला रविवार असल्यामुळे बँका बंद असतील, त्यामुळे तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम शुक्रवारी पूर्ण करू शकता नाहीतर 1 फेब्रुवारीला तुमचे काम पूर्ण करू शकता.

संप का होत आहे?
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) ची बैठक मुंबईत पार पडली, ज्यामध्ये बँक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी बँक संघटना संपावर जात आहेत.

बँकेचे काम १५ दिवसांत झाले पाहिजे
माहिती देताना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, युनायटेड फोरमची बैठक झाली असून, त्यात 2 दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले आहे की बँक युनियनची मागणी आहे की बँकिंगचे काम 5 दिवस झाले पाहिजे. यासोबतच पेन्शनही अपडेट करावी.

पगार वाढवण्याची मागणी
यासोबतच एनपीएस रद्द करून पगारवाढीसाठी चर्चा करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याशिवाय सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.