बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 1267 रिक्त पदांसाठी भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी..

डिसेंबर 28, 2024 8:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) तब्बल 1267 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलीय. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. तुम्ही 17 जानेवारी 2025 पर्यंत या भर्तीसाठी नोंदणी करू शकता. या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. Bank Of Baroda Bharti 2025

image 2

ही पदे भरली जाणार?
मार्केटिंग ऑफिसर, सेल्स मॅनेजर, सिनियर मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट मॅनेजर,सिक्युरिटी अॅनालिस्ट ऑफिसर, सिक्युरिटी अॅनालिस्ट मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, सिव्हिल इंजिनियर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. २१ ते ३७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. Bank Of Baroda Recruitment 2025

निवड प्रक्रिया
बँक ऑफ बडोदाकडून जाहीर केलेली ही भरती अनेक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन अर्ज करावेत आणि बँकिंग क्षेत्रात आपल्या कारकिर्दीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करावा. अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
पगार : 48,480/- ते 1,20,940/-

इतके अर्ज शुल्क भरावे लागेल
सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- रु. 600 + कर
SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज फी – रु 100
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now