⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | ‘नकोशी’च्या स्वागताचा ‘हवीशी’ जल्लोष !

‘नकोशी’च्या स्वागताचा ‘हवीशी’ जल्लोष !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । ‘मुलगी झाली हो…’ म्हणत नकोशीच स्वागत करण्यासाठी काहींची तोंड वाकडी होतात. स्री भ्रुणहत्येचा प्रश्नही डोक वर काढून असतोच. असे निराशेचे मळभ असताना अविनाश चौधरी यांच्या परिवारात मात्र ‘नकोशी’चे स्वागत ‘हवीशी’ म्हणून झाले. लक्ष्मी आली म्हणून कन्यारत्नाच्या आगमनासाठी बॕण्डच्या सुटावटींसोबत फुलांच्या पायघड्या देखील अंथरण्यात आल्या. चाळीसगाव परिसरात या सोहळ्याचे कौतुक होत आहे.

‘ती’ निर्माल्य नाही तर ‘निर्माती’ व जननी आहे. याच भावनेतून काही परिवारांमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत अलिकडे होऊ लागले आहे. फटाक्यांची आतषबाजी करीत सनईच्या मंगल स्वरात लक्ष्मीच्या आगमनाचे सोहळे काहीअंशी होतात. मालेगावरोडस्थित मे.जे.जे चौधरी फर्म’चे संचालक व भाजपाचे माजी शहराध्यक्ष, अविनाश जगन्नाथ चौधरी यांच्या परिवारातही सोमवारी ‘लेकी’ जन्मासोबतच तिच्या दवाखान्यातून येण्यापासून ते घरी येईपर्यंतचा जल्लोष साजरा करण्यात आला.

सनईचे स्वर आणि फुलांच्या पायघड्या

अविनाश चौधरी व सुनंदा चौधरी यांचे सुपूत्र राहुल व कावेरी राहुल चौधरी, यांना पहिले अपत्य हे कन्यारत्न झाले. ‘पहिली बेटी, स्नेह और आनंद की पेटी’ म्हणत चौधरी परिवाराने लेकी जन्माचा मोठा सोहळा करुन समाजास सकारात्मक संदेह देण्याचा अभिनंदनीय प्रयत्न केला.

सोमवारी मंद मंद विद्युत रोषनाईत अल्हाददायक गारव्यात सनई स्वर छेडले गेले. सोबतीला चौघड्याचा मंगल निनाद. यासोबतच बॕण्डच्या सुटावटीवर संपूर्ण परिवाराने ठेका धरत मुलीच्या जन्माचा जल्लोष केला. परिसरात जिलबी वाटून रहिवाश्यांचे तोंड गोड करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्याचे म्हणूनच सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलांनी कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. म्हणूनच स्री – पुरुष समानता जपण्यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागतही जल्लोषात झालेच पाहिजे. या भावनेतून हा सोहळा साजरा केला.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह