धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणणाऱ्या शाळांवर बंदी घालावी, जळगावात अभाविपची निदर्शने
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । तमिळनाडूमधील तंजावरच्या सॅक्रेड हार्ट विद्यालयातील घडलेल्या घटनेचा जळगाव अभाविपतर्फे निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी मार्फत तमिळनाडूचा राज्यपालांना या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तमिळनाडूमधील तंजावरच्या सॅक्रेड हार्ट विद्यालयातील 12 वी. मध्ये शिक्षण घेणारी एम.लावण्या या विद्यार्थिनींला विद्यालय प्रशासनाच्या वतीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून दबाव आणण्यात आला होता. त्याचा परिणाम त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगाव शाखेने या प्रकरणी निषेध व्यक्त करून निदर्शने केली. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. असे मत अभाविप जळगाव जिल्हा संयोजक ईच्छेश काबरा यांनी व्यक्त केले. तसेच या घटनेचा जाहीर निषेध करत महानगर मंत्री रितेश महाजन यांनी दोषींवर लवकरात लवकर कार्यवाही करावी. विद्येच्या ज्ञानमंदिरा मध्ये धर्मांतराचे षड्यंत्र खपवून घेतले जाणार नाही. असे मत व्यक्त केले. व सॅक्रेड हार्ट सारख्या मिशनरी शाळांवर बंदी घालण्याची मागणी केली.
यावेळी “शिक्षा के मंदिर मे धर्मांतर” नही चलेगा, ख्रिश्चन मिशनरी ओ सावधान, जाग उठा है भारत का जवान., बंद करा, बंद करा धर्मांतराला प्रोत्साहन करणाऱ्या शाळा बंद करा. आदी प्रकारच्या घोषणा देऊन सॅक्रेड हार्ट स्कूल मध्ये घडलेल्या प्रकाराचा महात्मा गांधी रोड जळगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सारंग कोळी, चैतन्य बोरसे, गौरव चौधरी, मयूर माळी, वेदांत भट, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन