
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मध्यम प्रकल्पातील साठा 95 टक्के तर मोठ्या प्रकल्पातील साठा 91 टक्के वर पोहोचला आहे. यामुळे एकंदरीतच जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे

जळगाव जिल्ह्यातील 13 मध्यम प्रकल्पांपैकी १० प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यात झालेल्या परतीच्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात ही मोठी वाढ झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील एकूण जलसाठा हा ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यात मोठे प्रकल्प 91 टक्के तर मध्यम प्रकल्प 95 टक्के आणि लहान प्रकल्प ५७% एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. येत्या ८ ऑक्टोबर पासून परतीचा पाऊस पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे जलसाठा १००% होण्याची शक्यता आहे.
रविवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला आरंभ होईल असं म्हटलं जात होतो मात्र रविवारी काही पाऊस झाला नाही. मात्र येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होईल. असा अंदाज आहे. नवरात्र उत्सवाच्या शेवटी दसऱ्याच्या आसपास पुन्हा जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याच्या शक्यता आहे. मंगळवारपासून शहरात पावसाने उसंत जरी घेतली असती तरी लवकरच जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे.






