दुर्दुवी ! गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून परतणारे दोन जण अपघातात ठार

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ जानेवारी २०२३ | नाशिक येथून नातेवाईकाचा गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून परतणारे दोन जण अपघातात ठार झाले. ही घटना चोपड्यानजीक रविवारी मध्यरात्री घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत.

कठोरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नितीन दामू मोरे (४५, रा.विद्या विहार कॉलनी, चोपडा) आणि गणेश काशिनाथ देशमुख (३२, रा, सुंदरगढी चोपडा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडुरंग देशमुख (३०), चूनीलाल खुशाल देशमुख (३०) हे जखमी झाले आहेत.

गणेश देशमुख, गुड्डू देशमुख, बाबा देशमुख, चूनिलाल देशमुख हे चार जण नाशिक येथे गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून ते रविवारी रात्री रेल्वेने जळगाव येथे आले. चोपडा येथे ते दुध वाहून नेणार्या गाडीने परतत होते. अडावदनजीक एका ट्रकने या गाडीला मागून धडक दिली. त्यात वरील दोन जण ठार झाले.