⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

बी.यु.एन. रायसोनी स्कूलला जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार


जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । प्रेमनगर येथील बी.यू.एन.रायसोनी इंग्लिश मीडियम स्कुलला शासनातर्फे स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2022 माध्यमिक शिक्षण विभागाच्या देखरेखीत जिल्हाधिकारी राऊत यांच्या सुचनेनुसार वितरण करण्यात आले.

बी.यु.एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कुलच्या मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेत कोणतीही कसुर होणार नाही याबाबत नेहमीच दक्षता घेतली. कोरोनानंतर शाळा सुरु झाल्यानंतर मास्क व हॅण्डवॉश केल्याशिवाय स्कुलमध्ये एकाही विद्यार्थ्याला किंवा पालकांना प्रवेश मिळत नव्हता.त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. त्यातच स्कुलचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना नियमित हात स्वच्छ धुण्याची सवय लावली. त्यामुळेच कोरोना काळात एकाही विद्यार्थ्यांला आजारपण आले नाही, हे विशेष.

जळगाव महानगरपालिकातंर्गंत व तालुक्यातून 7 शाळांना हे पुरस्कार देण्यात आले. यातून रायसोनी स्कूलला स्वच्छता, विद्यार्थ्यांना नियमित हँडवॉश करण्याची सवय लावण्यासाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार देण्यात आला.


यांनी दिला पुरस्कार


या प्रशस्तीपत्रक मनपा तालुका गटशिक्षणाधिकारी पठाण यांच्याहस्ते शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांना देण्यात आला. शाळेच्या स्वच्छेतेबाबत शाळेचे पालक,केंद्रप्रमुख फेगडे, संस्थेचे चेअरमन शिरीष रायसोनी यांनी शाळेला मिळालेल्या पुरस्काराबाबत अभिनंदन केले.