⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

बातमीदार आल्हाद जोशी यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । एरंडोल येथील तालुका बातमीदार आल्हाद जोशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशस्तरीय अधिवेशनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले.मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे अध्यक्षस्थानी होते.माजीमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर,आमदार राजूमामा भोळे,महापौर जयश्री महाजन,जिल्हाधिकारी अभिजित राऊत,जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे,धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,उपमहापौर कुलभूषण पाटील पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे प्रमुख पाहुणे होते.


     आल्हाद जोशी हे सुमारे ३३ वर्षांपासून सकाळचे तालुका बातमीदार म्हणून काम करीत आहेत.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आल्हाद जोशी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.पूर्वीच्या एरंडोल विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत असतांना आल्हाद जोशी यांनी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी महापौर जयश्री महाजन,आमदार राजूमामा भोळे,माजीमंत्री गुलाबराव देवकर,प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,कार्याध्यक्ष दिगंबर महाले यांनी मनोगत व्यक्त केले.मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी प्रास्ताविक केले.जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले.यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकारांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास पोलीस उपाधीक्षक राकेश जाधव,जैन उद्योग समुहाचे अनिल जोशी,उद्योजक मनोज वाणी,पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे,नाजनीन शेख,वैभव स्वामी,एरंडोल तालुकाध्यक्ष संजय चौधरी,रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी,लीना जोशी,रवींद्र कुलकर्णी यांचेसह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.आमदार चिमणराव पाटील,माजीमंत्री डॉ.सतीश पाटील,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,राजेंद्र चौधरी यांचेसह विविध राजकीय,सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी आल्हाद जोशी यांचे अभिनंदन केले.