अनिलराज पाटील यांच्या चित्राला पुरस्कार

एप्रिल 13, 2022 3:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । दुबई येथील आंतरराष्ट्रीय पातळीच्या संकटमोचन या फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऑनलाइन घेतलेल्या स्पर्धेचा १० एप्रिल अर्थात राम नवमीला निकाल जाहीर झाला. यात देशामधील २०० कलावंतांनी सहभाग नोंदवला होता. यात चोपड्याचे चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांच्या चित्राला अनिल कुमार केजरीवाल यांनी तसेच आर्ट ज्युरीने विशेष दर्जाचा पुरस्कार दिला आहे.

patil 6

डिजिटल प्रमाणपत्र व पदक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यासाठी अनिलराज पाटील यांना त्यांचे गुरु राजेंद्र महाजन व शिक्षकांसह चित्रकार चंद्रशेखर कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले. अनिलराज पाटील यांना सलग ६ महिन्यात तिसरा आंतरराष्ट्रीय पातळीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now