⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महाराष्ट्रातून औरंगजेब हद्दपार …. आता संभाजीनगर

जळगाव लाईव्ह न्यूज । Aurangabad renamed to sambhaji nagar । कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामाकरण संभाजीनगर करून औरंगझेबाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी होत आहे. खुद्द हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती. कॅबिनेट बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणला गेला असून तो मंजूर केला गेला आहे.

औरंगाबादचा नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणण्यात आला नंतर त्याला मंजुरी देण्यात अली आहे. (Aurangabad renamed to sambhaji nagar)

परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचविली होती. शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्ष संभाजीनगर करा ही मागणी रेटून धरली होती. गेल्या अडीच वर्षापासून संभाजीनगर आम्ही करणार आहोत असं कित्येकदा सांगूनही उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता राज्यातील परिस्थिती बदलू लागली आहे. लवकरच सत्ता पालट होऊ शकतो हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे कद्दावर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले असून आता ते गुहाटी येथे आहेत. या ठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतर ४० आमदारही आहेत. यामुळे आता राज्यात सत्तापालट होणार यावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला असून लवकरच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण केले आहे. याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत आणण्यात आला आणि मंजूरही करण्यात आला. याचबरोबर उस्मानाबादचे नाव देखील आता धाराशिव असणार आहे. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील हे नाव देण्यात आले आहे.