जळगावात तरुणाच्या घरावर मध्यरात्री तलवारीने हल्ला

डिसेंबर 27, 2023 6:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ डिसेंबर २०२३ | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील धनाजी काळे नगरात राहणारे मक्तेदार विशाल वाघ यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन तलवारी आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला केला. संपूर्ण थरारक प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

IMG 20231227 182325 jpg webp

धनाजी काळे नगरात राहणारे विशाल वाघ हे मक्तेदार असून रेल्वे आणि इतर विभागांच्या कामाचे ठेके घेतात. मंगळवारी रात्री ते भावासोबत बाहेर गेलेले होते. रात्री ११.५० वाजेच्या सुमारास ७ ते ८ दुचाकीवरून १५ ते १८ हल्लेखोर आले. दोन हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन विशाल वाघ यांच्या आणि त्यांच्या घरासमोर असलेल्या एका घराच्या पत्री शेडवर तलवारीने हल्ला केला. सर्व हल्लेखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकी देत काही वेळाने निघून गेले.

वाघ यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली. काही वेळाने पोलिसांनी वाघ यांच्या घरी येऊन सीसीटिव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. दरम्यान, हल्लेखोरांनी आणखी दोन जणांच्या घरी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now