लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

जुलै 31, 2021 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेला लग्नाचे आमिष देत तिच्यावर तीन वर्ष अत्याचार केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अत्याचार करणाऱ्यामुळे एक अपत्य देखील झाले आहे.

crime

शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विवाह झाल्यानंतर तिच्या घराजवळच राहणाऱ्या राजेश भीमराव साळुंखे याच्या सोबत प्रेम संबंध जुळले होते. राजेश साळुंके याने लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान, तिच्या पतीला याबाबत कळल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. राजेश साळुंके याने एका मंदिरात विवाह केला त्यानंतर विवाहितेला त्याच्यामुळे एक अपत्य देखील झाले.

मंदिरात विवाह केल्यानंतरही राजेश विवाहितेसोबत राहत नव्हता. काही दिवस दोघे मालेगाव येथे राहिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ त्याला घेऊन जळगावी निघून आले. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. एकदा राजेशने विवाहितेला हॉटेलमध्ये घेऊन जात जबरदस्तीने अत्याचार केला. राजेश आपल्यासोबत राहण्यास येत नसून एक अपत्य जन्माला घालत आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने विवाहितेने रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now