निंबाच्या झाडाला गळफास घेऊन अट्रावलच्या शेतमजुराची आत्महत्या

ऑक्टोबर 5, 2021 12:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका शेत मजुराने शेताच्या बांधावरील असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री घडली. भानुदास निळकंठ चौधरी (वय ४५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

याबाबत असे की, अट्रावल येथील शेतमजुर भानुदास चौधरी यांनी सोमवारी  रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अट्रावल शिवारातील कालीदास निळकंठ चौधरी यांच्या शेतात गेले. शेताच्या बांधावरील असलेल्या निंबाच्या झाडावर दोरी बांधुन त्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये शेतकरी कालीदास चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलीस अमलदार अशोक जवरे हे करीत आहे. मयत भानुदास चौधरी यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकले नाहीय. चौधरी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी मयत भानुदास चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now