⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित

जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर रोजी निकाल स्पष्ट होत असून सकाळी १२ वाजेपर्यंतच्या कलानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. यात रावेर आणि जामनेर मध्ये भाजपचे उमेदवार यांनी विजयी गुलाल उधळला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का मिळाला आहे.

राज्याची विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची होती. महाविकास आघाडी व महायुती अशीच थेट लढाई पाहण्यास मिळत होती. मतदानानंतर आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून सध्याच्या कलानुसार महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. २८८ जागांपैकी महायुतीला २१७ जागांवर जवळपास विजय निश्चित केला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर विजय मिळताना दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील हेच चित्र पाहण्यास मिळत असताना आज जाहीर झालेल्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड झाले असून महायुतीला सर्व जागांवर आघाडी असून विजय निश्चित मानला जात आहे.

जळगाव जिल्ह्यात जागा वाटप करताना भाजपला ५, शिवसेना शिंदे गट ५ आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक जागा मिळाली होती. जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळाले आहे. १२ वाजेच्या कलानुसार जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे. तर रावेर-यावल मतदार संघात स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांनी देखील विजय मिळविला असून त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांचा पराभव केला. दुसरीकडे चाळीसगावमध्ये देखील भाजप आमदार मंगेश चव्हाण विजयच्या दिशेने आहेत. तर महायुतीच्या इतर जागांवरील उमेदवार आघाडीवर असल्याने जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सगळे उमेदवार विजयच्या दिशेने आहेत. जळगाव ग्रामीणमधून देखील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.