तुम्हाला तर पाहतोच म्हणत, दंडावर घेतला जोरात चावा

जुलै 11, 2022 2:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । लग्नात बोलचालीच्या व भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तुम्हाला तर उद्या पाहतोच म्हणत, एकाच्या उजव्या दंडावर जोरात चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बोदवड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 81 jpg webp

निलेश दिलीप बावस्कर (वय २६ रा.मुक्तळ ता.बोदवड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. निलेश व त्यांचे दिलीप बावस्कर यांना संशयित आरोपी हरिदास लक्ष्मण बावस्कर, माणिक लक्ष्मण बावस्कर व सुधाकर लक्ष्मण बावस्कर सर्व रा. मुक्तळ ता.बोदवड यांनी लग्नात बोलचालीच्या व भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच निलेश व त्याचे वडील दिलीप बावस्कर यांच्या उजच्या दंडावर संशयित आरोपी हरिदास लक्ष्मण बावस्कर यांनी जोरदार चावा घेतला.

या प्रकरणी निलेश दिलीप बावस्कर यांनी बोदवड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी हरिदास लक्ष्मण बावस्कर, माणिक लक्ष्मण बावस्कर व सुधाकर लक्ष्मण बावस्कर सर्व रा. मुक्तळ ता.बोदवड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदीप वानखडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now