जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । यावल शहरात चाकू घेऊन फिरणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. देवानंद सपकाळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील एका तरुणाकडे धारदार चाकू असून तो रविवारी सायंकाळी शहरातील बुरुज चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयित आरोपी देवानंद बाळू सपकाळे (वय ३५, रा.किल्ला झोपडपट्टी शिवाजी नगर, यावल) याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील चाकू जप्त केला. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून देवानंद सपकाळेवर गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक सुनीता कोळपकर तपास करत आहे.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






