घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक

ऑगस्ट 7, 2023 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरातील बाजारपेठसह वस्ती असलेल्या परिसरात घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन जणांना अटक केली. या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर, गॅस भरणारे कॉप्रेसर, वजन काटा आदी असा एकुण १ लाख रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Untitled design 7 jpg webp

शहरातील बळीराम पेठ परिसरात अवैधरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. आहे. त्यानुसार बळीराम पेठ येथील दुर्गादेवी मंदीरासमोरील एका टपरीवर आणि त्याच परिसरातील मराठी शाळा क्रमांक १७ जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी १२ वाजता छापा टाकला. यात संशयित आरोपी फारूख रौफ खाटीक (वय २८, रा. न्यू फेडरेशन, पिंप्राळा), आणि शाकीब खान सलीम खान केली.

(वय ३५) रा. काट्या फाईल शनीपेठ, जळगाव है। दोघे आपापल्या टपरीमध्ये अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करून रिक्षात व इतर वाहनात भरत असतांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलेंडर, वजन काटा, ईलक्टीक पंप सोडलेले कॉम्प्रेसर व इतर साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सपोनि निलेश राजपूत, पोहेकॉ अक्रम शेख, किरण धनगर, पोना प्रमोद लाडवंजारी, प्रितम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now