महिलेचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ संशयितास अटक

एप्रिल 12, 2022 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । वरणगाव शहरातील एका भागातील ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग झाला. या प्रकरणी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल होता. संशयित तरुणाला अटक केली.

crime 1 1 jpg webp

अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात पीडित महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित संदीप लखीचंद बनवे (वय ३८, रा. बुनकर वाडा) याने शनिवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. नंतर महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले. पीडितेने वरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन संदीप बनवे विरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now