---Advertisement---
भडगाव

अमित शहांसह मुकेश अंबानींचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या भडगावच्या जवानाला वीरमरण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२३ । राष्ट्रीय वरिष्ठ नेते, अभिनेते व उद्योगपती यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या भडगाव तालुक्यातील जवान यांना मुंबईत उपचार सुरू असतांना शनिवारी रात्री वीरमरण आले आहे. दीपक मधुकर हिरे असे या जवानाचे नाव असून ते भडगाव तालुक्यातील सिंधी कोळगाव येथील रहिवासी आहे.

deepak hire jpg webp webp

स्व.दिपक हिरे हे सन-२००२ मध्ये गांधीनगर येथे सीआरपीएफ जवान म्हणून भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे ट्रेनिंग व सैनिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनेते, उद्योगपती व राष्ट्रीय वरिष्ठ नेते यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. यामध्ये भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी, भारताचे गृहमंत्री अमित शहा, अभिनेते सनी देवल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत व्हीआयपी संरक्षण टीममध्ये अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे.

---Advertisement---

त्यांनी आपल्या सेवेत देश सेवा करत आपली जन्मभूमी असलेल्या गावात सुद्धा कुटुंबातील सदस्यांना समाजसेवेचा मौल्यवान सल्ला देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्याचे नेहमीच सांगत असत. स्व. दीपक हिरे यांचे आई, वडील शेतात दिवस रात्र मेहनत करून आपल्या दोन मुलांना यशस्वीपणे शिक्षण दिले. त्यापैकी दीपक हिरे यांना देशाच्या सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये पाठवण्यासाठी घरच्यांनी समर्थन दिले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---