जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । शहरातील राजश्री शाहू खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बांभोरी यांच्यातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त क्रिकेट लीग, वकृत्व स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी छत्रपती शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ एच महाजन उपस्थित होते. दरम्यान, या विविध स्पर्धांच्या माध्यमातून विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

क्रिडा क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा.आर.व्ही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य कुंदन पाटील, प्रा.परमेश्वर महाजन, प्रा.निखिल वाघ, प्रा.शुभम पाटील, प्रा.शांताराम वाघ, प्रा. शुभम भोई व प्रथमेश बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पाटील व आभार प्रदर्शन परमेश्वर महाजन यांनी मानले.
हे देखील वाचा :
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात






