⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तुम्हाला हि आहे मोबाईल गेम खेळण्याची सवय? तर तुमचा अंगठा होऊ शकतो वाकडा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२३ । सर्वसामान्य कुंटुंबातील नागरिकांना आता इंटरनेट आणि स्मार्टफोन परवडू लागले आहे. यामुळे गेल्या काही वर्षात भारतीय गेमिंग क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर गेम खेळत आहेत. मात्र यामळे आता गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंडिया मोबाइल ऑफ गेमिंगच्या अहवालानुसार, भारतीय लोक आठवड्यातून सरासरी ८.३६ तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात तर, ६० टक्के गेमर्स एकावेळी सतत ३ तास गेम खेळतात. सतत मोबाइल गेममुळे अंगठा वाकडा होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ही सवय कमी करण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. ६५% मुले ऑनलाइन गेमिंगसाठी जेवण व झोपेकडेही दुर्लक्ष करत आहेत. (why one shoud not play mobile games)

कोणते आजार होतात?
अंगठ्याची हालचाल करणाऱ्या टेंडनना सूज
मोबाईल गेम खेळणाऱ्यांची बोटे सुजल्यामुळे वाकडी होतात किंवा वाकतात आणि ती सरळ करता येत नाहीत.
कोपरभोवती सूज येते.
जास्त गेमिंगमुळे डोळ्यांवर दाब येतो
उदासीनता व डिप्रेशन होऊ शकते.
हिंसक वृत्ती वाढते, जास्त चिडचिड किंवा रागीट स्वभावात बदल होणे. ()

काय कराल?
गेमिंगचे व्यसन असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या मित्रांना रुग्णाला कसे हाताळायचे हे समजावून सांगितले जाते.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, सहसा वेळ घालवण्यासाठी गेम खेळायला सुरुवात होते, पण याचे सवयीमध्ये, आणि नंतर व्यसनामध्ये रूपांतर होते व जीवनाचा महत्त्वाचा भाग बनते, हे खेळणाऱ्याला कळत नाही.