निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । महाराष्ट्र शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला कोषागार कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र.सि. पंडित यांनी केले आहे.
जळगाव कोशागारातून निवृत्तीवेतन घेणारे राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक तसेच इतर राज्याचे महाराष्ट्र शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी १ नोव्हेंबरपासून हयातीचा दाखला कोषागारात सदर करणे आवश्यक आहे. हयातीचा दाखला आपण ज्या बॅंकेमार्फत निवृत्तीवेतन घेत असाल त्या बँकेमध्ये कोषागाराने पाठविलेल्या हयातीच्या यादीमध्ये आपल्या नावासमोर दिनांकीत करणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोशागार अधिकारी प्र.सि. पंडित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.