जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

गिरीश महाजनांनी डागलं संजय राऊतांवर टिकास्त्र; म्हणाले आता त्यांना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. अशात दररोज विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत. तसेच सत्ताधारी देखील विरोधकांवर आरोपांच्या आणि टिकेच्या फैरी झाडत आहेत. त्यात आता मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टिकास्त्र डागलं आहे.

संजय राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यावर प्रत्युत्तर देताना महाजनांनी नाव घेता राऊतांवर टीका केली आहे. आता त्यांना घरीच बसण्याची वेळ येणारं आहे आणि सकाळी उठून पोपटपंची सारखं बोलण्याची वेळ येणार आहे, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता संजय राऊत यांना पुन्हा टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे.

राज्यातून उत्तर महाराष्ट्रच महायुतीला सर्वात जास्त जागा देणार आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होणार असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button