⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पर्यावरण संवर्धनासाठी वाहनांचा अनावश्यक वापर टाळा, यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी करणे शक्य

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे, लहानसहान कामासाठी वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनचे प्रमाण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम आपण सर्व अनुभवत आहोत. याला आळा घालायचा असेल तर प्रत्यक्ष कृती करून वाहनांचा अनावश्यक वापर टाळायला हवा, असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले.


चैत्र नवरात्री प्रारंभच्या निमित्ताने नुकताच शैक्षणिक आगाजतर्फे सुराणा साधना भवनमध्ये कार्बन क्रेडिटची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी आमदार संजय सावकारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रजनी सावकारे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, आयपीएस अधिकारी आतिष कांबळे, सुगनचंद सुराणा, यतीश डुंगरवालकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षांची पूजा करून मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले.


डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनीही वृक्षांचे महत्त्व सांगून वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढते. या तापमानाचे परिणाम आपण भुसावळकर जाणत आहातच. हे तापमान कमी करायचे असेल कमीत कमी वाहनाचा वापर करून, वृक्ष लावणे व ते जगवणे आवश्यक आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक नाना पाटील यांनी केले. शैक्षिक आगाज तर्फे सन २०२२ पासून दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आठवड्यात कार्बन क्रेडिटची शपथ दिली जात अाहे. आतापर्यंत जिल्ह्याभरात विविध माध्यमांतून ३२ हजार विद्यार्थी व नागरिकांना शपथ दिली आहे. यामध्ये प्रत्येकाने कमीत कमी वाहनाचा वापर करावा. आरोग्य जपण्यासाठी सायकलचा वापर करावा असे आवाहन या प्रतिज्ञेच्या माध्यमातून दिली जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला वैद्य रघुनाथ सोनवणे, जयंतीलाल सुराणा, महावीर शेटे, जितेंद्र बेदमुथा, नीलेश जैन, मोहनीश बाफना, विजय चोरडिया, कांतीलाल चोरडिया, निशांत पाटील, पद्माकर घोडके, सौरभ जैन, परिसरातील महिला भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम चोरडिया यांनी तर आभार सुरेंद्रसिंग पाटील यांनी मानले.
कमीत कमी वाहनाचा वापर करून, वृक्ष लावणे व ते जगवणे आवश्यक आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक नाना पाटील यांनी केले. शैक्षिक आगाज तर्फे सन २०२२ पासून दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आठवड्यात कार्बन क्रेडिटची शपथ दिली जात अाहे. आतापर्यंत जिल्ह्याभरात विविध माध्यमांतून ३२ हजार विद्यार्थी व नागरिकांना शपथ दिली आहे. यामध्ये प्रत्येकाने कमीत कमी वाहनाचा वापर करावा. आरोग्य जपण्यासाठी सायकलचा वापर करावा असे आवाहन या प्रतिज्ञेच्या माध्यमातून दिली जात असल्याचे सांगितले.